• Mon. Oct 14th, 2024

समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार? १९ जुलैला नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार; शक्तिप्रदर्शनची तयारी

ByPolitical Views

Jul 17, 2024



समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार? १९ जुलैला नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार; शक्तिप्रदर्शनची तयारी

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – समाजवादी पक्षानं महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. परंतू आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व न मिळाल्यास महाराष्ट्रात आपण स्वबळावर लढू असा इशारा पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी गेल्या आठवड्यात दिला आहे. त्यामुळं समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये विजयी झालेले सर्व नवनिर्वाचित ३७ खासदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि सत्कारासाठी मुंबईत येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे ३७ उमेदवार विजयी झाले आहेत. यानंतर सपा प्रत्येक राज्यात आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने काम करत आहे. १९ जुलैला वांद्रे रंग शारदा येथे सर्व खासदारांचा समाजवादी पक्ष महाराष्ट्राच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. तर आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून मुंबईतील आपल्या व्होटबँकेला अधिक सक्षम करण्यासाठी समाजवादी पक्षाने या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची चर्चा आहे. सपा खासदारांच्या मुंबई दौऱ्या दरम्यान अखिलेश यादव यांच्यासह सर्व खासदार चैत्यभूमी, गांधी संग्रहालय आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दादर येथे भेट देणार आहेत.

आपल्या सर्व ३७ खासदारांचा एकाच ठिकाणी सन्मान करुन शक्तिप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे. समाजवादी पक्षानं महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. परंतू आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व न मिळाल्यास महाराष्ट्रात आपण स्वबळावर लढू असा इशारा पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, पुढच्या काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वगआला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरु आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता समाजवादी पार्टी देखील विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची चर्चा सुरु झाली आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें