• Thu. Oct 10th, 2024

मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत सापडला तीन वर्षापासून बेपत्ता असलेला व्यक्ती; कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का

ByPolitical Views

Jul 21, 2024



मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत सापडला तीन वर्षापासून बेपत्ता असलेला व्यक्ती; कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – तीन वर्षापासून बेपत्ता असलेला व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरीतीत सापडला आहे. गेले तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो “आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले तीन वर्षापासून आपल्या कुटुंबापासून बेपत्ता होते. त्यांचा कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला परंतु तांबे कुटुंबियांना ज्ञानेश्वर तांबे मिळून आले नाही. अखेरीस तीन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या “आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबाला धक्काच बसला आहे.

याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की आमचे वडील गेले तीन वर्षापासून हरवले होते आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो परंतु ते सापडत नव्हते. आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे ही विनंती केली आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें