• Mon. Oct 14th, 2024

महायुतीचं काय होणार? अजित पवार यांची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा

ByPolitical Views

Jul 21, 2024



महायुतीचं काय होणार? अजित पवार यांची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कसबा विधानसभा मतदारसंघात पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीबरोबर, यावर स्पष्टीकरण दिले आहे. मागील दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला या निवडणुका केव्हा होणार, असा प्रश्न पडला आहे. लोकसभा निवडणूक भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन लढवली. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीमधील तीनही पक्ष स्वतंत्र लढतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असताना. अजित पवार यांनी विधानसभा आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. त्यात अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन आपण आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार आहोत, पण त्यानंतर होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें