• Mon. Oct 14th, 2024

मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सगळी सविस्तार माहिती

ByPolitical Views

Jul 23, 2024



मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प; काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सगळी सविस्तार माहिती

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ – २५ सादर केला. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी ३.० सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्प मांडताना निर्माला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. केंद्र सरकारकडून २० लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली. कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल असंही अर्थमंत्री म्हणाल्या.

काय स्वत होणार?

सोनं, चांदी स्वस्त होणार, सोनं-चांदीवर ६.५ टक्के ऐवजी ६ टक्के आयात कर, मोबाईल हँडसेट, मोबाईल चार्जरच्या किंमती १५ टक्क्यांनी कमी होणार, मोबाईलचे सुटे भाग,कॅन्सरवरची औषधे,पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत, लिथियम बॅटरी स्वस्त, इलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार,सोलार सेट स्वस्त होणार,चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू, पीवीसी फ्लेक्स बॅनर आणि विजेची तार स्वस्त होणार.

काय महाग होणार?

प्लास्टीक उद्योगांवर करांचा बोझा वाढणार व प्लास्टीक उत्पादने महाग होणार

अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरच्या औषधावरील आयार कर करण्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, औषध आणि वैद्यकीय कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी ३ औषधांवरील आयात कर पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे, एक्स-रे ट्यूबवरील शुल्क देखील कमी करण्यात आले आहे. यानंतर देशात कॅन्सरवरील तीन औषधे स्वस्त होतील. नव्या कररचनेत स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारांवरुन ७५ हजारांवर, ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री,३ ते ७ लाख उत्पन्न – ५ टक्के आयकर आणि ७ ते १० लाख उत्पन्न- १० टक्के आयकर,१० ते १२ लाख उत्पन्न – १५ टक्के आयकर,१२ ते १५ लाख उत्पन्न – २० टक्के आयकर तसेच १५ लाखांवर उत्पन्नावर – ३० टक्के आयकर भरावे लागणार.

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होईल. शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले जाणार आहे. यातून शेतीपिकांचे सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तसेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावलं उचचली जाणार आहे. आगामी वर्षात आम्ही नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. मोदी ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा केली. पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या सरकारी योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत एमएसएमईंना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिलं जात होतं, ते आता २० लाख रुपये करण्यात आलं आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें