महायुतीत घसरण सुरुच! अजित पवार गटा नंतर भाजपमध्ये पडझड ; भाजपचा आणखी एक नेता कांग्रेसमध्ये दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
लातूर – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शनिवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपला देखील मोठा धक्का बसला आहे. उदगीर मतदारसंघात भाजपसाठी हा दुसरा धक्का आहे. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपची साथ सोडत हाती तुतारी घेतली होती, त्यांतर आता भाजपचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदगीर मतदार संघात भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी हातात तुतारी घेतल्यानंतर आता उदगीर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांनी देखील भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.
लिंगायत समाजाचे नेतृत्व म्हणून त्यांची उदगीर मतदारसंघात ओळख आहे, अचानक निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांच्या राजीनाम्यामुळे या मतदारसंघात भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान त्यापूर्वी शनिवारी महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.