• Thu. Oct 10th, 2024

ठाणे ठाकरे गट महिला आघाडींचा थेट सरकारला इशारा; कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही तो घेऊ

ByPolitical Views

Jul 31, 2024



ठाणे ठाकरे गट महिला आघाडींचा थेट सरकारला इशारा; कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही तो घेऊ

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – पाच दिवसांपूर्वी उरण येथील २२ वर्षीय यशश्री शिंदेची निघृण हत्या करण्यात आली. यापूर्वीही कावेरी नाखवा, अक्षता म्हात्रे या महिलांचा नाहक बळी गेला आहे. एकामागून एक अशा दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. परंतू, अजूनही सरकारला जाग आलेली नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने दिला. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात काळी फीत लावून संताप व्यक्त करीत हल्लाबोल केला. राज्यात सध्या कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळे गुन्हेगार राजकीय वजन वापरून पुन्हा मोकाट फिरत आहेत, अशी टिका त्यांनी यावेळी केली. अशा गुन्हेगारांचा खटला फास्ट ट्रॅकवर चालून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अशा घटनेला आळा बसेल, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिला असुरक्षित आहेत. राज्याचे गृहखाते आणि पोलीस यंत्रणा काय करत आहेत? असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. अपुऱ्या पडणाऱ्या पोलीस मनुष्यबळामुळे पोलीस खाते हतबल झाले आहे. प्रामुख्याने ठाण्यातील पोलिसांचा मनुष्यबळ सत्तेतील राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना आणि गुंडांना सुरक्षा देण्यात व्यस्त असल्याने महिलांचे मंगळसूत्र चोरी, छेडाछेडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यासाठी पोलिसांचा मनुष्य बळ सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबियांकडून आणि गुंडांकडून काढून घेऊन २४ तास रस्त्यावर पोलिसांचे ग्रस्त पथक वाढविण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्याकडून करण्यात आली आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें