अनिल देशमुखांनी उल्लेख केलेला चांदिवाल आयोगाचा अहवाल समोर, सचिन वाझेंचं बिंग फुटलं?
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत” असा आरोप सचिन वाझे याने केला होता. यानतंर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांदिवाल आयोगाचा अहवाल समोर आणावा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. आता चांदिवाल आयोगाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांसाठी कोणतेही पैसा जमा केलेले नाहीत, असं उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुखांनी यांनी स्वत:च चांदिवाल आयोगाचा एक अहवाल समोर आणला आहे. या चांदिवाल आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चीट दिली आहे. या अहवालात सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांसाठी कोणतेही पैसा जमा केलेले नाहीत, असं उत्तर दिले आहे. तसेच देशमुखांनी किंवा त्यांच्या कार्यालयातून कुणी बार मालकाकडून पैसे गोळा करण्यास सांगितलेले मला आठवत नाही, असेही सचिन वाझे यांनी यावेळी म्हटले होते.
जे काही झालं, त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुखांपर्यंत त्यांच्या पीए मार्फत पैसे जायचे. सीबीआयकडे याचे पुरावे आहेत. मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिलीय. मी सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को चाचणीसाठी सुद्धा तयार आहे. मी त्या पत्रात सर्व काही लिहिलं आहे. मी जयंत पाटील यांचं सुद्धा नाव दिलय” असं सचिन वाझे यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेचा आधार घेत माझ्याविरोधात पुन्हा एकदा आरोप करण्यास सांगितले. सचिन वाझे हा एक दहशतवादी असून त्याच्यावर दहशतवादी कट रचल्याप्रकरणी आणि दोन खून केल्याचे आरोप आहेत. सध्या तो जेलमध्ये आहे. अशा सचिन वाझेचा उपयोग देवेंद्र फडणवीसांना माझ्याविरोधात आरोप करण्यासाठी घ्यावा लागतो, ही खूप शरमेची बाब आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.