• Thu. Jan 16th, 2025

संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयाचा दणका, अजामीनपात्र वारंट जारी

ByPolitical Views

Aug 8, 2024



संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयाचा दणका, अजामीनपात्र वारंट जारी

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – भाजप नेते नितेश राणेविरोधात माझगाव कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी केलंय. भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माझगाव न्यायालयाने नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी कोर्टाने वॉरंट जारी केलंय. नितेश राणे मंगळवारी न्यायालयात हजर न झाल्यानं कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. माझंगाव न्यायालयाने जानेवारीतसुद्धा भाजप आमदार नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. २६ फेब्रुवारीला ते न्यायालयात हजर झाल्यानंतर ते रद्द केलं होतं. पण त्यानंतर पुन्हा नितेश राणे हजर झाले नाही. त्यांनी वेगवेगळी कारणे सांगत न्यायालयात हजर राहता येणार नाही असं सांगितलं होतं.

न्यायालयाने हजर राहण्याची सूट मागणारी नितेश राणेंची याचिका मंगळवारी फेटाळून लावण्यात आलीय. यानंतर संजय राऊत यांच्या वकिलांनी नितेश राणेंच्या विरोधात वॉरंट जारी करण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारत या प्रकरणी पुढची सुनावणी १७ ऑक्टोबरला घेणार असल्याचं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी गेल्या वर्षी संजय राऊत यांना साप म्हटलं होतं. संजय राऊत एक असा साप आहेत जे एक महिन्याच्या आत शिवसेना ठाकरे गटाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील असं म्हटलं होतं. हे वक्तव्य अपमानास्पद आणि साफ खोटं असल्यानं नितेश राणेंविरोधात कारवाई करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें