पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बघायचं आहे – बाळ्या मामा
ठाकरे गटातर्फे भिवंडीत भगवा सप्ताहचे आयोजन;भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचा सन्मान
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे भिवंडीत भगवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले.या निमित्त अनेक सेवाभावी उपक्रम राबविले गेले.भिवंडी तालुका प्रमुख कुंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित समारोप सोहळ्यात महविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्या भाषणात खासदार म्हात्रे यांनी जोरदार बॅटिंग करत सांगितले की मी बऱ्याच ठिकाणी विसरतो की मी राष्ट्रवादीत आहे, असे म्हणताच सर्वच ठाकरे गटाचे पदाधिकारी खळखळून हसले. दरम्यान बाळयामामा यांनी सांगितले माजी अंत:करणातून इच्छा आहे, की मला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साहेबाना सीएमच्या खुर्चीत बघायचं आहे असे सांगितले. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले ठाकरेंना बघायचं असे बाळयामामा म्हणाले. बाळ्यामामा म्हात्रे यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. यंदा लोकसभेत त्यांनी शरद पवार गटाकडून निवडणुक लढवली आणि बहुमताने ते जिंकून आले आहेत. दरम्यान या कार्यक्रमात खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सांगितले की मी महविकास आघाडीचा खासदार असल्याने शिवसेना पक्षाचा शिवसैनिकांचा मी नेहमीच सन्मान करणार असे बाळ्यामामा म्हणाले. भिवंडी ग्रामीण विधानसभेमध्ये शिवसेना पक्षाचाच आमदार निवडून आणण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न करणार असल्याचं शब्द देत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले पाहण्याचे स्वप्न आहे, असे वक्तव्य करत बाळ्यामामा यांनी थेट विधानसभेसाठी चॅलेज घेतल्याचे दिसून आले.
तुमच्या माहिती साठी सांगतो, मी बरच्या ठिकाणी विसरतो की मी राष्ट्रवादीत आहे…मी शिवसेनेत असल्या सारखेच वागतो आणि तसाच बोलतो..आपल्याकडे अशी पद्धत आहे आणि त्याच्याकडे तशी पद्धत आहे..एक दोन वेळा आमच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले तू आता राष्ट्रवादीत आहे.. मी अंत:करणातून सांगतो, पुन्हा एकदा उद्धवसाहेबांना त्या जागेवर बघायचं… मी खासदार आहे, अशी स्टेमेन्ट नाहीं दयायला नाहीं पाहिजे..पण मी जबादारीने सांगतो..माझी अंत:करणातून इच्छा आहे, मला पुन्हा एकदा साहेबांना त्या खुर्ची बघायचं आहे असे बाळ्यामामा म्हात्रे यांनी बोलून दाखवले.