नवाब मालिक शेवटी अजित पवार गटात; मालिक यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्ती
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिक यांनी अखेर महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत नवाब मलिक सोमवारी व्यासपीठावर दिसून आल्याने त्यांची भूमिका उघड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मलिक कोणाकडे राहणार, यावरुन राष्ट्रवादीत रणकंदन सुरू होतं. मात्र, मलिक यांच्या भूमिकेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली होती. जेव्हा फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा सुप्रिया सुळे एकटी त्यांच्या बाजूने बोलली होती, असेही सुळे यांनी बोलून दाखवले. पण सोमवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना मोठी जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे. अजित पवार यांनी सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देण्यात येत असलेल्या जबाबदारीची घोषणा केली. सना मलिक वडिलकीच्या नात्याने माझ्याकडे येत असते. तिच्या विधानसभा क्षेत्रातील लोकांची कामं ती घेऊन येत असते. आज मी जाहीर करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सना मलिक ही स्पोकपर्सन प्रवक्ता असेल. एक मोठी जबाबदारी आपण तिला देत आहोत, असे म्हणत अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्या कन्येकडे मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो. सनाचं इंग्रजी, हिंदी चांगलं आहे, आता मराठीपण चांगला होईल, तू घाबरू नको, असेही अजित पवार यांनी म्हटले.
आपण एक आठवड्यापूर्वी यासाठी तयारी सुरु केली होती आणि अचानक कळलं की मला आज या कार्यक्रमात भाषण करायचं आहे. १३ वर्षांपासून अजित दादा आणि माझं नातं आहे, त्यांनी माझ्या कार्यालयाचं तेंव्हा उद्घाटन केलं होतं. याच ठिकाणी आपण ५ वर्षांपूर्वी अनुशक्तीनगर निवडणुकीची सुरुवात केली होती, आणि नवाब मलिक यांना निवडून आणले. त्यानंतर आपल्याला रिटर्न गिफ्ट म्हणून मलिक साहेब यांना मंत्री केल्याची आठवण सना मलिक यांनी भाषणात सांगितली. कोरोनाचा काळ होता, तेंव्हा मोठी अडचण आमच्यासमोर आली. दीड वर्ष आमच्यासोबत कुठलाही आमदार नव्हता. मात्र, जेंव्हा गरज पडली तेंव्हा अजित दादांनी मला साथ दिली. नवाब मलिक अनुपस्थित असताना अनेकांनी कटकारस्थान केलं, काम थांबविले. पण, दादांनी संकटात आमची साथ दिल्याचंही सना मलिक यांनी म्हटलं.