• Thu. Oct 10th, 2024

जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं बॅण्डिंग करण्यापेक्षा त्यांची काळजी घ्या- राज ठाकरेंचा संताप

ByPolitical Views

Aug 21, 2024



जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं बॅण्डिंग करण्यापेक्षा त्यांची काळजी घ्या- राज ठाकरेंचा संताप

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर येथे आदर्श शाळेमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. बदलापूरमध्ये काल या घटनेच्या निषेधार्ह आंदोलन करण्यात आलं होतं, दोन चिमुकल्यांना ओरबाडणाऱ्या नराधमाला फाशी द्या, या एका मागणीसाठी काल अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं. बदलापूरमध्ये शाळेतील दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी सर्वसामान्य नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण योजना आणा, असे फलकही आंदोलकांकडून झळकले. त्यामुळे, या घटनेचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडू होत आहे. तर, विरोधकही या घटनेवरुन आक्रमक झाले आहेत, मविआकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‌ट्विट करुन राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली असून आज ते गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. दरम्यान, बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन संतप्त शब्दात राज ठाकरे यांनी भावना व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं आहे. बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण बोललो तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

स्वतःच ब्रँडिंग करण्यापेक्षा तिच्या सुरक्षेची भावना निर्माण करा

जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय, याचा मला अभिमान आहे. पण, मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असेही राज यांनी ट्विटरवरुन लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें