गेट आऊट’ ऑफ इंडिया करून दाखवा, मग्रुरीने माफी नको’- उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात जोड़े मारो आंदोलन मध्ये मवीआकडून राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खडेबोल
योगेश पांडे वार्ताहर
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गच्या राजकोटवर कोसळला. या पार्श्वभूमिवर रविवारी सरकारचा निषेध करण्यासाठी ‘जोडे मारो’आंदोलनाचे महाविकास आघाडीने आयोजन केले होते. त्यासाठी हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चाचेही आयोजन केले होते. हा मोर्चा गेट वे वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खडेबोल सुनावले. शिवाय ‘गेट आऊट’ ऑफ इंडिया अशी घोषणा देत सरकारला गेट आऊट करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना आणि शिवप्रेमींना या वेळी केलं. उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषण करत महायुती सरकार बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी खडेबोल सुनावले. महायुतीने मोठी चुकी केली आहे. पंतप्रधाना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी माफी मागितली आहे. पण चुकीला माफी नाही अशा शब्दात ठाकरेंनी खडसावले. हे सरकार शिवद्रोही आहे. त्याचा संताप व्यक्त करण्यासाठी आलो आहे. अशा या शिवद्रोही सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया करण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले. छत्रपतींचा पुतळा कोसळला असं असताना सत्ताधारी राजकारण करत आहेत. त्यांचे हे राजकारण नसून गचकरण असल्याचा हल्लाबोल ठाकरे यांनी यावेळी केला
छत्रपतींचा पुतळा कोसळला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. माफी मागितली नसती तर महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना सोडलचं नसतं. माफी मागताना मोदींनी मग्रुरीने माफी मागितली असा आरोपच ठाकरे यांनी केला. अशी मग्रुरीने माफी मागणे आम्हाला मान्य नाही असेही ते म्हणाले. मोदी माफी मागत होते आणि त्याच व्यासपिठावर एक उपमुख्यमंत्री हसत होता, असा दावा ठाकरे यांनी केला. ऐवढी थट्टा तुम्ही करता का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मोदींनी माफी कसासाठी मागितली, पुतळा पडला म्हणून? पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचारा झाला म्हणून? की या सर्वांवर पांघरूण घालत आहात म्हणून? असा प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी केला. पण माफी मागून काही उपयोग नाही. चुकीला माफी नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. जिथे जिथे मोदी हात लावत आहेत तिथे तिथे सत्यानाश होत आहे असं ही ते म्हणाले. या मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ही उपस्थित होते. यावेळी त्यांनी छोटेखानी भाषणातून सरकारवर ताशेरे ओढले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या सरकारने केला असल्याचे शरद पवार म्हणाले. गेट वे ऑफ इंडियावर असलेला छत्रपतींचा पुतळा हा पन्नास वर्षापासून इथे उभा आहे. हाही समुद्री किनारी आहे. अनेक पुतळे या महाराष्ट्रात उभे आहेत. पण मालवण मधील कोसळलेल्या पुतळा उभारताना त्यात भ्रष्टाचार झाला आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळेच तो कोसळला. त्यानंतरही सरकार ज्या पद्धतीने बोलत आहे ते म्हणजे संपूर्ण शिवप्रेमींचा अपमान असल्याचा आरोप यावेळी शरद पवार यांनी केला. राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा या सरकारने अवमान केला आहे. हे सरकार कमिशन खोरी आणि भ्रष्टाचारात अडकले आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. छत्रपतींची प्रतिमा कोसळणे हे साधी गोष्ठ नाही. त्यामुळे छत्रपतींचा अवमान तर झालाच आहे पण राज्यालाही खाली मान घालावी लागली आहे. शिवाजी महाराजा हे आमचे दैवत आहे. त्यांचा अवमान कोणीही सहन करणार नाही. त्यामुळे आम्ही सर्व या सरकार विरोधात एकत्र आलो आहोत. या सरकारला आता माफी नाही. त्यांना आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. यावेळी शिवद्रोही सरकार चले जाव ची घोषणा नाना पटोल यांनी दिली.