• Thu. Oct 10th, 2024

सर्वेक्षणानं वाढवली भाजपची चिंता; अमित शहांनी महायुतीच्या नेत्यांना दिला राजकीय चित्र बदलण्याचा कानमंत्र

ByPolitical Views

Sep 9, 2024



सर्वेक्षणानं वाढवली भाजपची चिंता; अमित शहांनी महायुतीच्या नेत्यांना दिला राजकीय चित्र बदलण्याचा कानमंत्र

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.यंदाच्या वर्षा अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. या निवडणुकीसाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या प्रायोगिक आणि जन सर्वेक्षणानुसार, यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला १२३ तर महाविकास आघाडीला १५२ जागा मिळू शकतात.दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली.या बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध शासकीय योजनांबाबत जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असं मानलं जात आहे. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं नुकत्याच केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरही चर्चा झाली.या बैठकीत अमित शहा यांनी भाजप नेत्यांना वादग्रस्त वक्तव्य करणं टाळण्यासोबतच, वाद टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आपण महायुतीत आहोत, त्यामुळे आपल्यातील प्रत्येकानंच संयम बाळगला पाहिजे आणि एकात्मतेची प्रतिमा जनतेसमोर येईल याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, विधानसभेच्या उमेदवारीसाठी विजयी क्षमता असलेल्या योग्य उमेदवारांची निवड करण्याचाही सल्ला दिला. त्याचप्रमाणे विरोधकांच्या फेक नरेटिव्हला प्रत्युत्तर देत राहा, असंदेखील अमित शाह यांनी सांगितलं आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें