वनगानंतर महायुतीचे बंडखोर अपक्ष उमेदवार अमित घोडा नॉट रिचेबल, २४ तासांपासून संपर्क होईना
योगेश पांडे/वार्ताहर
पालघर – विधानसभा निवडणुकीच्या धामधुकीत राज्यात मोठ्या हालचाली घडत आहेत. पालघर येथे काहीच दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने व्यधित झालेले श्रीनिवास वनगा हे बेपत्ता झाले होते. त्यानंतर जवळपास ३६ तासांनी ते घरी परतले. तर आता, पालघर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमित घोडा हे गेल्या २४ तासांपासून नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमित घोडा यांनी भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. पालघर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अमित घोडा यांनी शिवसेना शिंदे गटाविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमित घोडा हे आता नॉट रिचेबल झाले आहेत. अमित घोडा यांनी भाजपमधून बंडखोरी करत पालघर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता अमित घोडा नॉट रिचेबल झाले आहेत.
पालघर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, पालघर विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेना शिंदे गट महायुतीत आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. भारतीय जनता पक्षाचे डहाणू विधानसभा प्रमुख अमित घोडा यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. शिंदे गटाविरोधात बंडखोरी करत भाजपचे अमित घोडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, बंडखोरी केलेले अमित घोडा हे कोणाच्याही संपर्कात नाहीत. चोवीस तासाहून अधिक कालावधी उलटला तरीही कोणाशीही त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. नॉट रिचेबल होण्यापूर्वी अमित घोडा यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातून अमित घोडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी वरिष्ठांकडून त्यांची समजूत काढण्यासाठी फोन करण्यात येत आहेत. मात्र, घोडा नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. ते गेल्या २४ तासांपासून नॉटरिचेबल आहेत.