दादरच्या शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधानांची सभा; मुंबईत ट्रॅफिक अलर्ट, महत्त्वाचे मार्ग बंद
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये मोदींची सभा होणार आहे. या सभेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत काही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली. तसेच काही मार्गांवर वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला तसेच दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मंगळवारी वाहतूक निर्बंध आणि वळवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस यांच्यासह १४ नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या जाहीर सभेत मोठ्या संख्येने समर्थक जमू शकतात.
याचपार्श्वभूमीवर वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून सभेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहने येण्याची शक्यता आहे. या काळात मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये , यासाठी दादर आणि आजूबाजूच्या १४ मार्गांवरील वाहनांसाठी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध राहणार आहेत. या काळात वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे.