इंद्रसेन उपाध्या आणि विश्वबंधु राय यांची मुंबई भाजप सचिवपदी नियुक्ति
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – अंधेरी भाजपचे कर्तव्यनिष्ठ आणि ब्राम्हण सेवा संघचे संस्थापक व उत्तर भारतीयांमध्ये भाऊ आशी ओळख असणारे वरिष्ठ नेते इंद्रसेन उपाध्या यांची भाजप मुंबई प्रदेश सचिवपदी नियुक्ति करण्यात आली आहे तसेच बटेंगे तो कटेंगे चा नारा मुंबई मध्ये प्रथम बुलंद करणारे व माजी कांग्रेसनेते विश्वबंधु राय यांची सुद्धा भाजप मुंबई प्रदेश सचिवपदी नियुक्ति करण्यात आली आहे.
दोन्ही नेत्यांची उत्तर भारतीय समाजात मजबूत पकड असून साधारण जनतेच्या गरजेवेळी तत्पर हजर राहण्याची ओळख आहे.भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष एड. आशीष शेलार यांच्या कडून दाखवण्यात आलेल्या विश्वासावर आम्ही खरे उतरु अशी आशा इंद्रसेन उपाध्या आणि विश्वबंधु राय यांच्या कडून व्यक्त करण्यात आली आहे.