डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन दिवस लोकल दिवस रात्र सुरू राहणार
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – गणेशोत्सव निमित्त मध्य रेल्वे यांनी दोन दिवस रात्रभर लोकल चालू ठेवली होती त्याच प्रमाणे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ डिसेंबर २०२४ ते ६ डिसेंबर २०२४ रोजी दोन दिवस रात्रभर लोकल सेवा चालू ठेवावी अशी विनंती राष्ट्रीय बहुजन संघ या संघटना मार्फत मध्य रेल्वे मुख्य व्यवस्थापक प्रभात रंजन यांना पत्र दिले. तसेच मुंबई विभागीय रेल्वे मंडळ रजनीश कुमार गोयल यांना पत्र दिले. त्यांचे सहाय्यक यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांचा शिपाई पाठवून वरीष्ठ मंडळ परिचलान प्रबंधक पी.एन.रामाचंद्रन यांच्याकडे पाठवले तिथे चर्चा होऊन त्यांनी तात्काळ दखल घेऊन रेल्वे अधिकारी यांना आदेश दिला आहे.
तसेच मुंबई विभागीय रेल्वे मंडळ रजनीश कुमार गोयल यांचे सहाय्यक यांनी मोबाइल मध्ये पत्राची प्रिंट घेऊन रेल्वेच्या सर्व विभागाला सुचना दिल्या आहेत. मध्यरेल्वे अधिकारी यांनी सहकार्य केल्याची माहिती प्रविण लक्ष्मण बागुल-सरचिटणीस राष्ट्रीय बहुजन संघ यानी दिली आहे. त्यावेळी रितेश राजाराम पवार संघटक राष्ट्रीय बहुजन संघ हे ही उपस्थित होते.