• Thu. Jan 16th, 2025

ईव्हीएम हटाओ… लोकशाही बचाओ!

ByPolitical Views

Dec 4, 2024



ईव्हीएम हटाओ… लोकशाही बचाओ!

ठाण्यात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राष्ट्रपतींना पाठविले दहा हजार पोस्टकार्ड

योगेश पांडे/वार्ताहर 

ठाणे – निवडणुका मतदान यंत्राद्वारे घेण्याऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) ने बुधवारी ठाण्यात अनोखे आंदोलन केले. ईव्हीएम हटाओ… लोकशाही बचाओ असा नारा देत राष्ट्रवादी (शरद पवार गट) विधिमंडळातील गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी सामान्य नागरिकांची एकूण दहा हजार पोस्ट कार्ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविली. यामध्ये मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही निवडणुकांचा धांडोळा घेतल्यास मतदान यंत्र (ईव्हीएम) बाबत जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधील मतदान यामध्ये तफावत असल्याचीही काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. ही बाब गंभीर असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारी आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी (शरद पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. राष्ट्रवादी (शरद पवार गट) विधिमंडळातील गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या ठिकाणी कोरे पोस्टकार्ड ठेवून ईव्हीएम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. ” सामान्य भारतीय नागरिकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशय अधिकाधिक गडद होत असल्याने भावी काळात लोक मतदानापासून दूर जाण्याची शक्यता असल्याने ईव्हीएमवर बंदी आणून जगभरात ज्या पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेतले जात आहे. त्याच पद्धतीने भारतात मतपत्रिकेचा वापर करावा”, अशा आशयाचा मजकूर या पोस्टकार्डवर लिहिण्यात आला होता. ही सर्व पोस्टकार्ड मुख्य डाक कार्यालयातील पत्रपेटीमध्ये डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनीच टाकली. ईव्हीएम हटाओ… लोकशाही बचाओ असा नारा यावेळी देण्यात आला.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें