संघाराम बुद्ध विहारचा लोकार्पण सोहळा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हस्ते संपन्न
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – घाटकोपर पूर्व येथील कामराज नागरच्या कोकण वैभव चाळ येथे नवनिर्मित संघाराम बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री आरपीआई (अ) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला. या बुद्ध विहाराचे नुतनीकरण स्थानिक आमदार पराग शाह यांच्या निधीतून करण्यात आले आहे. या बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा स्थानिक समाजसेवक आणि विद्धविहारचे अध्यक्ष बालुभाऊ सोनावणे यांच्या देखरेखाखाली आयोजित करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या बुद्धविहाराचे नुतनीकरणचे आचारसहिंते मध्येच पूर्ण झाले होते. पण, काही तांत्रिक अडचणामुळे त्याचा लोकार्पण झाला नव्हता.समाजसेवक बालूभाऊ यानी सांगितल्याप्रमाणे या बुद्धविहारामध्ये स्थापित मूर्तीच्या अगोदर इथे शोभायात्रेमध्ये मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर मूर्ति स्थापित करण्यात आली. ज्याचा लोकार्पण नामदार रामदास आठवले यांचा हस्ते करण्यात आले.या पसंगी बुद्ध विहाराचे भन्तेजीना चिवरदान करण्यात आले. या कार्यक्रमात पूर्व भाजपा नगरसेवक भालचंद्र सिरसाट,भाजपा नेता अशोक राय,आरपीआईचा गौतम सोनावणे,डीएम मामा,पूर्व नगरसेवक परमेश्वर कदम,काका गांगुरडे,राजा गांगुरडे,रवि नेटावते,कैलाश बर्वे,समाजसेवक व भाजपा नेता प्रकाश सच्चन,संजय तपासे,रामसमुझ गौतम,मुकेश जगताप,सतीश जगताप आदि मान्यवर उपस्थित होते. बुद्धजन सेवा संघचे देवीदास काले, महेंद्र अंकुश, प्रकाश अंकुश, बबन पाचरने, संतोष तावड़े, दिलीप सोनावणे, अनिल काकड़े आणि जैसवार विकास संघचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ही या प्रसंगी मोठ्या संख्याने उपस्थित होते.या वेळी उपस्थित सर्व मान्यवारांचे स्वागत सत्कार बुद्ध विहाराचे अध्यक्ष बालू सोनावणे आणि त्यांचे इतर पधाधिकारयानी केली. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सोनावणे यानी मानले.