जिल्हा परिषद तसेच सर्व पंचायत समित्यांमध्ये मानवी हक्क दिन साजरा
प्रमोद तिवारी/प्रतिनिधी
पालघर – पालघर जिल्हा परिषद तसेच सर्व पंचायत समितीमध्ये मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. पंचायत समिती पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अतुल पारस्कर, प्रभारी गटविकास अधिकारी बापूराव नाळे तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवदिन साजरा करण्यात आला. मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत.मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.
जीवनाधिकार
यातनांपासून मुक्तता
गुलामगिरीपासून मुक्तता
कोर्ट सुनावणीचा अधिकार
भाषण स्वातंत्र्य
वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात.