सामाजिक कार्यकर्ते इरफान दिवटे यांचा गौरव
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – गोवंडी शिवाजी नगरचे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सध्या चर्चेत आहेत, त्यांच्या प्रशंसनीय लोक कल्याणकारी कार्यामुळे त्यांना शांतीलाल सिंघवी संस्थेच्या सौजन्याने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडीत असलेले आणि प्रदीर्घ काळ समाजसेवा करणारे इरफान मुनाफ दिवटे विभागातील गरजूंना मोकळ्या मनाने मदत करत असतात. त्यांनी शांतीलाल सिंघवी नेत्र संस्थेचा माध्यमातून गोवंडी येथील शिवाजी नगरमध्ये राहणाऱ्या ५० हून अधिक लोकांना मोफत शस्त्रक्रिया, वैद्यकीय उपचार करून दिलेले आहेत. सर्व गरजूंना मोफत शस्त्रक्रिया करून ते सर्व रुग्णांना मदत करतात आणि त्यांच्या या उदात्त कामाचे कौतुक म्हणून प्रसिद्ध नेत्र रुग्णालय शांतीलाल संघवी संस्थेने पुरस्कार प्रदान करून सन्मान केला आहे. त्याबद्दल श्री. दिवटे यांनी संस्थेचे व संचालकांचे आभार मानले आहेत. त्याना मिळालेल्या या पुरस्कार बद्दल स्थानिक लोकांनी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.