• Thu. Jan 16th, 2025

धक्कादायक! कोणाच्या आदेशाने होत आहे आव्हाडांची रेकी?

ByPolitical Views

Jan 3, 2025



धक्कादायक! कोणाच्या आदेशाने होत आहे आव्हाडांची रेकी?

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर गोपनीय पोलिसांची नजर,पत्रकार परिषद सुरू असतानाच घरात घुसून शूटिंग

योगेश पांडे/वार्ताहर

ठाणे – मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या एसबी पोलीस (गोपनीय विभागची) नजर असल्याचं समोर आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले. ही पत्रकार परिषद आव्हाडांच्या घरात सुरू होती. समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं चित्रिकरण देखील करण्यात आलं आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या घरात पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत घुसले, त्यांच्याकडून चित्रिकरण देखील करण्यात आलं. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पत्रकार परिषद सुरू असतानाच आव्हाड भडकले. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घरात का घुसले? आसा सवाल आव्हाडांकडून पोलिसांना करण्यात आला आहे. सरकारला नक्की वॉच ठेवून काय साध्य करायचे आहे? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान यावेळी आव्हाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील फोन केला. जोपर्यंत वरिष्ठ पोलीस इथे येत नाही तोपर्यंत यांना सोडणार नाही, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना गोपनीय विभागाचे पोलीस तिथे पोहोचले, ही पत्रकार परिषद आव्हाड यांच्या घरात सुरू होती. पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं चित्रिकरण देखील करण्यात आलं आहे. यावरून आता आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घरात का घुसले? सरकारला नक्की वॉच ठेवून काय साध्य करायचे आहे? असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें