• Mon. Mar 17th, 2025

शरद पवारांचे स्वीय म्हणून काम करणाऱ्या तुकाराम धुवाळी यांचं निधन; शरद पवार यांनी ट्विटर अकाऊंटवरुन वाहिली श्रद्धांजली

ByPolitical Views

Feb 19, 2025



शरद पवारांचे स्वीय म्हणून काम करणाऱ्या तुकाराम धुवाळी यांचं निधन; शरद पवार यांनी ट्विटर अकाऊंटवरुन वाहिली श्रद्धांजली

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – सध्याच्या काळात नगरसेवकांना देखील पीए म्हणजेच स्वीय सहायक असतात. त्यामुळे, स्वीय सहायक ही नेतेमंडळींची गरज बनली आहे. राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपल्या शासन व प्रशासनासंदर्भातील कामाचा लेखाजोखा ठेवण्यासाठी, मांडण्यासाठी विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी प्रत्येकाला हवा असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार हे गेल्या ६० वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून ५५ वर्षांहून अधिक काळ ते संसदीय राजकारणात आहेत. त्यामुळे, त्यांच्याकडे देखील अनेक स्वीय सहायक गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. विशेष गेल्या ५३ वर्षांपासून शरद पवारांचे स्वीय सहायक म्हणून काम करणाऱ्या तुकाराम धुवाळी यांचे बुधवारी निधन झाले. आपल्यासोबत ५३ वर्षे सोबती राहिलेल्या, प्रत्येक क्षणात साथी बनलेल्या तुकाराम धुवाळी यांच्या निधनाबद्दल शरद पवारांनी दु:ख व्यक्त करत आठवणी जागवल्या आहेत. मी १९७२ पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी. विशेष म्हणजे ही जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहून सांभाळली. अतिशय विश्वासू, प्रामाणिक व सचोटीने वागणारा, नीगर्वी तसेच सतत हसतमुख असणारा, प्रत्येक व्यक्तीशी आदरानं वागणारा, प्रत्येकाचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा निराळ्या सहकाऱ्याचं देहावसान झालं, याचं मला अत्यंतिक दु:ख होतंय, अशा शब्दात शरद पवारांनी स्वीय सहायक धुवाळी यांच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या कामाचा व्याप जसा वाढत जातो तेव्हा अशी काही माणसं जवळ असावी लागतात की, ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चिंतपणे वेगवेगळ्या प्रकारची कामं करु शकतो. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चिंतपणे, प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यात आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही, अशातीलच धुवाळी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचं दु:ख होतंय, त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो असे शरद पवार यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. शरद पवारांनी तुकाराम धुवाळी यांचा फोटोही शेअर केला.

दरम्यान, शरद पवार हे वयाच्या २७ व्या वर्षी आमदार बनून विधानसभेत पोहोचले होते. त्यानंतर, मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, देशाचे कृषीमंत्री यांसारख्या मोठ्या पदांवर त्यांनी काम केलंय. त्यामुळेच, त्यांच्या या कामात त्यांचे सोबती राहिलेल्या धुवाळी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत तब्बल ५३ वर्षे शरद पवारांचे विश्वासू सहायक म्हणून काम पाहिले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें