• Mon. Mar 17th, 2025

माहीम विधानसभेत पुन्हा येणार ट्विस्ट; सदा सरवणकरांची ठाकरे गटाचे आमदार महेश सांवतांविरोधात उच्च न्यायालयात धाव

ByPolitical Views

Feb 26, 2025



माहीम विधानसभेत पुन्हा येणार ट्विस्ट; सदा सरवणकरांची ठाकरे गटाचे आमदार महेश सांवतांविरोधात उच्च न्यायालयात धाव

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सदा सरवणकर यांनी महेश सावंत यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. २८ फेब्रुवारीला याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माहीम विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. सदा सरवणकर यांनी महेश सावंत यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत महेश सावंत यांनी निवडणुक प्रतिज्ञापत्रार चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप सदा सरवणकरांनी केला आहे. गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञपत्रात दाखवणे आवश्यक आहे मात्र जनतेची दिशाभुल करुन स्वत वरील चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप महेश सावंत यांच्यावर याचिकेतून केला आहे. त्यामुळे माहीम विधानसभेत पुन्हा एकदा ट्विस्ट येणार का?, अशी चर्चा रंगली आहे.

माहीम विधानसभेत मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत झाली होती. यामध्ये ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी बाजी मारली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीममध्ये निवडणूक लढवत असल्याने हा मतदारसंघ चर्चेत आला होता. अमित ठाकरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. अमित ठाकरेंचा पराभव करून, उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत ‘जायंट किलर’ ठरले आहेत. महेश सावंत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सदा सरवणकर यांचा १ हजार ३४० मतांनी पराभव केला होता. शिवसेनेत बंड झाल्यानंतर महेश सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. महेश सावंत १९९० पासून शिवसेनेत सक्रीय आहेत.महेश सावंत यांचे वडील देखील शिवसेनेत कार्यरत होते. सावंत यांची ओळख माहीमचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक अशी होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सदा सरवणकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी महेश सावंत यांनी देखील त्यांच्यासोबत पक्ष सोडला होता. मात्र, महेश सावंत पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. आता २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महेश सावंत हे सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंचा पराभव करत आमदार झाले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें