• Mon. Mar 17th, 2025

धनंजय मुंडे राजीनामा देणार का?

ByPolitical Views

Mar 2, 2025



धनंजय मुंडे राजीनामा देणार का?

करुणा मुंडे यांची धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य; अर्थसंकल्पाआधी धनंजय मुंडे राजीनामा देणार?

योगेश पांडे / वार्ताहर 

बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, वाल्मीक कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खंडणीच्या वादातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा उल्लेख या आरोपपत्रात आहे. तसेच, या प्रकरणात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा समावेश करण्यात आला आहे. पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांमध्ये पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे, तसेच हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान वाल्मिक कराड या प्रकरणाचा सूत्रधार असल्याने आता मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची आता चर्चा रंगली आहे. अशातच करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केलं आहे. करुणा मुंडे यांनी एक सूचक पोस्ट केलेली आहे, त्यात त्यांनी म्हटंल आहे, सोमवारी ३ मार्च २०२५ रोजी राजीनामा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी गेल्या काही दिवसात सातत्याने होत आहेत. विरोधकांसह महायुतीतील काही आमदार देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावरती ठाम आहेत. अशातच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत, त्यांच्यावरती आरोप होत आहेत. त्यानंतर आथा पोलिसांच्या आरोपपत्रानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का? असा सवाल उपस्थित होत असतानाच करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केले आहे.

सोमवारी म्हणजेच तीन मार्च रोजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार अशी फेसबुक पोस्ट करूणा मुंडे यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शनिवारी पोलिसांच्या आरोप पत्रात वाल्मीक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्यावरील राजीनामाची मागणी आणि दबाव वाढत आहे. अशातच करुणा मुंडे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. तीन मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही पोस्ट केली आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याची मागणी वाढत आहे. सत्ताधारी पक्ष असो, विरोधक असो किंवा सामाजिक संघटना असो यांच्याकडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. त्यानंतर आता स्वतः करुणा मुंडे यांनी केलेली पोस्ट यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राजीनामाच्या पोस्टबाबत बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या,१००% मला आतून अशी माहिती मिळालेली आहे, की दोन दिवसाआधी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलेला आहे. सोमवारी शंभर टक्के त्यांचा राजीनामा होणार आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलं होतं की, जरी वाल्मीक कराड दोषी निघाला, तर मी स्वतः राजीनामा देणार.. आणखीन एक गोष्ट म्हणजे आता त्यांच्यासमोर कोणताही पर्याय राहिला नाही. त्यामुळे त्यांना आता राजीनामा द्यावा लागेल. मला अशी माहिती आहे की, अधिवेशनाच्या अगोदर त्यांच्याकडून अजितदादा राजीनामा घेणार आहेत. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा द्या. त्यानंतर आता मी मागणी करते, जे दोषी निघालेले आहेत, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील सांगितलं होतं जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल.

ज्यावेळी वाल्मीक कराड सरेंडर झाला होता, त्यावेळी त्यांनी देखील सांगितलं होतं. जो कोणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संतोष देशमुख यांची इतकी निर्घृण हत्या केली गेली, अशी हत्या महाराष्ट्रात आतापर्यंत कधी झाली नाही, त्यासाठी मी मागणी करते, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असेही करूणा मुंडे यांनी म्हटलं. धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यासाठी मोठ्या उशीर झाला आहे. ज्या दिवशी वाल्मीक कराड सरेंडर झाला होता, त्याच दिवशी त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. नैतिकतेच्या भावनेतून त्यांनी तेव्हाच राजीनामा देणं गरजेचं होतं. अजित पवारांनी सुद्धा म्हटलं होतं, नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे नैतिकता नसेल त्यामुळे राजीनामा देण्यासाठी उशीर झालेला आहे पुढे करूणा मुंडे यांनी म्हटले आहे. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या थेट हात असेल असं मला वाटत नाही,आज मी २७ वर्षे त्यांच्यासोबत राहिली आहे. ते अशा वृत्तीचे नाहीत. धनंजय मुंडे माझे पती आहेत. ते अशा वृत्तीचे नाहीत. पण, वाल्मीक कराडने त्यांच्या पावरचा सत्तेचा वेळोवेळी, २०१४ पासून कराड त्यांच्या सत्तेचा गैरवापर करत आहे. यामध्ये धनंजय मुंडेंचा काही हात असेल असं मला वाटत नाही, असेही करूणा मुंडे यांनी म्हटलं आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें