मुंबई – मुंबईतून धक्कदायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवलीत सावत्र आजोबाने १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार केला आहे. कांदिवलीच्या कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीत गेल्या १० वर्षांपासून सावत्र आजोबा १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अत्याचाराची बाहेर वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी तरुणीला दिली होती. त्यामुळे गेली अनेक वर्ष तरुणी अत्याचार सहन करत होती. मात्र, पोलिसांत या घटनेची तक्रार नोंद होताच पोलिसांनी ५८ वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
तरुणी घरात एकटी असताना सावत्र आजोबा १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करत होते. गेल्या १० वर्षांपासून या सावत्र आजोबाकडून अत्याचार सुरु होता. या आजोबाकडून २०१४ पासून अत्याचार सुरू होते. तरुणीवर अत्याचार या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानंतर या आजोबाला बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.