मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात; १० मे रोजी श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये सभा
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तिसऱ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जातायत. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय पंचायत राजमंत्री खासदार कपिल पाटील तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खासदार श्रीकांत शिंदे व खासदार कपिल पाटील यांच्या विजयाची हॅट्रिक करण्याचा निर्धार महायुतीने केला. या पार्श्वभूमीवर यंदा येत्या दहा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कल्याणमध्ये होणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायतराज मंत्री खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे. याबाबत बोलताना खासदार कपिल पाटील यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देशात झंजावत सुरू आहे.
याचबद्दल बोलताना कपिल पाटील म्हणाले की, २०१४ च्या पार्श्वभूमीवर यंदा १० मे रोजी भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. मोदी यांच्या सभेच्या आधीच चित्र अतिशय पोषक आहे मोदी यांची सभा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या झंजावाताचं महायुतीच्या वादळत रूपांतर होईल, असा आम्हाला विश्वास आहे नरेंद्र मोदींचे विचार ऐकण्यासाठी जनता येत असते. त्यामुळे विजयावर शिक्कामोर्तब होतो. मोदींची सभा दोन्ही लोकसभा क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितलं. दरम्यान, केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी जातीला पाहून मतदान करु नका. विकासाला मतदान करा ,असे आवाहन मतदारांना केले होते. त्यानंतर आता कपील पाटील यांनी पुन्हा ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते. ते लोक जातीच्या राजकारणाचा आधार घेतात असा टोला, विरोधकांना लगावला आहे.
याबाबत बोलताना कपिल पाटील यांनी कुठलाही समाज जातीवर जाऊन मतदान करीत नाही. जनता सगळी सुशिक्षित झाली आहे. पण काही लोकांना अशा प्रकारे आधार घ्यावा लागता. ते जनतेची दिशाभूल करीत असतात. जनतेने विकासाच्या मुद्यावर मतदान करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाची घोडदौड सुरु आहे. म्हणून कुठल्याही समाजाला जातीवर मतदान करण्याचे आवाहन मी तरी कधी करीत नाही. कोणी करु ही नये. आपण विकासाच्या मुद्यावरच निवडणूका लढविल्या पाहिजेत. ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते. त्याला लोकांना कुठला ना कुठला आधार हवा असतो. म्हणून ते जनतेची दिशाभूल करीत असतात, असे पाटील यांनी सांगितले.