सुरेश म्हात्रेनी कपिल पाटील यांना धरलं धारेवर; बदलापूर रेल्वे स्थानकाच्या प्रश्नावरुन केली टिका
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी कल्याण ते बदलापूर रेल्वे प्रवास करत, बदलापूर स्टेशनची पाहणी केली आणि प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. केंद्रीय राज्य मंत्री, केंद्रीय मंत्री आणि खासदार कपिल पाटील यांना जनाची नाही तर मनाची लाज या खासदारला वाटायला हवी होती, असं म्हणत कपिल पाटलांवर सडकून टीका केली. भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी सांगितले की बदलापूर रेल्वे स्टेशनला आम्ही सर्वजण प्रवाशांशी संवाद साधत होतो. अतिशय वाईट अवस्था आणि वाईट अनुभव मला या रेल्वे स्टेशनवर आला. महिलांसाठी स्वतंत्र रेल्वे असावी तेवढं नसेल तर महिलांसाठी डब्बा तरी कुठेतरी वाढवण्यात यावा, अशा प्रकारची मागणी महिलांची होती. या स्थानकातून दररोज इतके प्रवासी प्रवास करतात त्यांच्यासाठी केवळ एक वॉशरूम आहे. दहा वर्षात कपिल पाटलांनी मला वाटतं एक-दीड महिन्यांपूर्वी बदलापूर स्थानकावरील एका फलाटाचे उद्घाटन केले, त्याची अवस्था पहा काय आहे, असं म्हणत त्यांनी कपिल पाटलांवर निशाणा साधला.
तीन वर्ष ते केंद्रीय मंत्री होते, खरं म्हणजे हे काम सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंतर्गत आहे, ते हे सहज करू शकले असते. परंतु, हे करण्याची त्यांची मानसिकता नाही. जनाची नाही तर मनाची लाज या खासदाराला या केंद्रीय मंत्र्याला वाटायला हवी. कारण, तुम्ही आज या लोकांच्या मतदानावर खासदार झालात, दीड वर्ष केंद्रीय मंत्री आहात, आणखी काय पाहिजे तरी सुद्धा तुम्ही एक साधं प्लॅटफॉर्मचं काम करू शकले नाही. फेऱ्या वाढवायचा तर सोडा महिलांच्या डब्यांचा प्रश्न सोडा एक साधं प्लॅटफॉर्मचं काम हे दहा वर्षात करू शकले नाहीत, अशा प्रकारचे हे निष्क्रिय खासदार समोर आहेत. माझ्या वतीने नाही सर्व सामान्य जनतेच्या वतीने मी त्यांचा निषेध करतो अशा प्रकारचे जे काम आहे ते शंभर टक्के चुकीचं आहे, असे म्हात्रे यांनी सांगितले.