भिवंडी मतदारसंघामध्ये मविआत बंडखाेरी; काॅंग्रेस नेते दयानंद चोरगे दाखल करणार उमेदवारी अर्ज
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्याच उमेदवाराला जनता पसंती देणार आहे हे निश्चित आहे. यामुळेच लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार असावा असा अनेकांचा आग्रह आहे. कार्यकर्त्यांनी मला आग्रह केल्यास मी निवडणुकीच्या रिंगणात उतरेन आणि काेणाच्या दबावाला बळी पडणार नाही असे ठाम मत काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी स्पष्ट केले. यामुळे भिवंडीत मविआत बंडखाेरी हाेणार की काय अशी चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे म्हणाले एकदा उमेदवारी अर्ज दाखल केला तर ताे मागे घेणार नाही. मी स्वाभिमानी आहे. बदलापूर काँग्रेसच्या कार्यालयात चोरगे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
दयानंद चोरगे म्हणाले सन्मानपूर्वक मान मिळत असेल तर कार्यकर्त्यांनी काम करायचे नाही तर बाहेर ऊन भरपूर आहे. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आता आपल्याला महाआघाडीच्या उमेदवाराला मदत करायची आहे असा आदेश काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला. भिवंडी लोकसभेवर काँग्रेसचा दावा असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीच्या प्रचारात काँग्रेस पक्ष सहभागी होत नसल्याने वरिष्ठांच्या आदेशानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दयानंद चोरगे यांनी माघारी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करण्याचे आदेश दिले मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातील संपलेली दिसत नाही आहे.