• Thu. Jan 16th, 2025

संजय निरुपम करतील संजय राऊत यांचा एनकाउंटर? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

ByPolitical Views

May 5, 2024



संजय निरुपम करतील संजय राऊत यांचा एनकाउंटर? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

योगेश पांडे – वार्ताहर 

ठाणे – शिवसेनेत संजय निरुपम हे प्रवक्ते व उपनेते म्हणून काम करणार आहेत. संजय राऊत यांना उत्तर द्यायला निरुपम यांना ठेवले, तर ते राऊत यांचा बोलण्यात इन्काउंटर करतील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात काँग्रेस नेते व माजी खासदार संजय निरुपम यांच्या शिवसेना पक्षातील प्रवेशादरम्यान लगावला. निरुपम यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने ते शिवसेना (उबाठा) प्रवक्ते संजय राऊत यांना ‘काउंटर’ करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांवर टीकास्त्र सोडले. राऊत फक्त टीकाटिप्पणी करतात, मात्र निरुपम विकासाची भाषा करतील, असेही शिंदे म्हणाले. टेंभी नाका येथील आनंद आश्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार संजय निरुपम आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निरुपम व काँग्रेसमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. निरुपम यांच्या शिवसेनेत येण्याने काँग्रेस रिकामी झाली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला नक्की होईल. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. निरुपम यांच्यावर उत्तर भारतीय समाजाचे समन्व्यक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार काम करताना काँग्रेसमध्ये अडचण येत होती. ती अडचण आता दूर झाली आहे. शिवसेनेला मजबूत करण्यासाठी पक्षात प्रवेश केला आहे. २० वर्षांनंतर कुटुंबासह स्वगृही परत येत आहे. महायुतीच्या मुंबईतील सहा जागा निवडून येणार, असा विश्वासही निरुपम यांनी व्यक्त केला.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें