मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी, सुप्रिया सुळेनीं घरातून बाहेर येताच चर्चांना पूर्वविराम
योगेश पांडे / वार्ताहर
बारामती – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवाऱी देशभरात उत्साहाचं वातावरण होता. तिसऱ्या टप्प्यात बारामतीमध्ये मतदान झाले. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी सहकुटुंब सकाळी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या घरी भेटीसाठी पोहोचल्या. त्या घरी जाण्यामागे नेमकं काय करण? याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी भेट दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देऊन या चर्चांना पूर्वविराम लावला. त्यांनी भेटीमागचं कारण स्पष्ट केलं. सुप्रिया सुळे यांनी अचानक काटेवाडी येथील घरी जात अजित पवारांच्या मातोश्री आशाकाकी पवार यांची भेट घेतली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेले आठवडाभर त्या मतदानाला येणार नाहीत अशी चर्चा असताना अचानक त्या काटेवाडी येथील अजित पवार यांच्या घरी पोहोचल्या आणि तिथे त्यांची भेट घेऊन त्या लगेचच बाहेर पडल्या. या भेटीदरम्यान मात्र अजित पवार घरी नसल्याचं सूत्रांकडून समजलं. त्यामुळे अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांची भेट काही झाली नाही. बारामतीमधून शरद पवार गटाकडून आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. बारामतीचा निकाल काय लागतो याकडे विशेष महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष आहे. तर दुसरीकडे अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.