• Mon. Oct 14th, 2024

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

ByPolitical Views

May 13, 2024



बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

योगेश पांडे / वार्ताहर

पाटणा – बिहारचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. सुशील मोदी हे बिहारमधील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या घशात कर्करोग झाला होता. त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुशील मोदी यांच्या निधनाच्या वृत्ताने बिहारच्या राजकारणात शोककळा पसरली आहे. बिहार भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि ही कधीही भरून न येणारी हानी असल्याचे म्हटले. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करून सुशील मोदी यांच्या निधनाची माहिती दिली. शोक व्यक्त करताना सम्राट चौधरी यांनी लिहिले, ‘बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी राज्यसभा खासदार श्री सुशील कुमार मोदी जी यांना त्यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. बिहार भाजपचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी X वर पोस्ट करताना लिहिले की, ‘बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी जी आता आमच्यात नाहीत. भाजपच्या संपूर्ण संघटनात्मक परिवाराचे तसेच माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. सिन्हा म्हणाले, ‘त्यांची संघटनात्मक कौशल्ये, प्रशासकीय समज आणि सामाजिक-राजकीय मुद्द्यांचे सखोल ज्ञान यासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील.’ या दु:खाच्या प्रसंगी देव दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबीयांना बळ देवो, असेही सिन्हा म्हणाले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें