• Thu. Oct 10th, 2024

चक्की पिसिंग म्हणणाऱ्यांचं किसिंग करताय, त्यांच्या मांडीला मांडी लावताय, राऊतांचे एका दगडात दोन निशाणे

ByPolitical Views

May 17, 2024



चक्की पिसिंग म्हणणाऱ्यांचं किसिंग करताय, त्यांच्या मांडीला मांडी लावताय, राऊतांचे एका दगडात दोन निशाणे

राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात त्यांच्याबरोबरच जातात ही त्यांची खासियत, राऊतांचा टोला

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – पाचव्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा शुक्रवारी दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. संजय राऊतांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं म्हटलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींच्या राज ठाकरेंसोबतच्या सभेवर टीका केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तसेच अजित पवारांना तुम्ही तुरुंगात टाकणार होता चक्की पिसिंग आता पिसिंगच्या ऐवजी किसिंग करतायत असा ही टोला त्यांनी लगावला. संजय राऊत म्हणाले, या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने सुपारीची बंद होणार. त्यातील राज ठाकरे यांचे एक दुकान आहे. तीन चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होणार आहे. त्यातीलच एक हे दुकान आहे. महाराष्ट्रात कोणी येऊ दे जितक्या सभा घेतील तितकी वाट लागेल. प्रधानमंत्री मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात म्हणजे तुम्ही दहा वर्षात काही केलं नाही म्हणून येत आहेत. ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या त्यांना मांडीवर घेऊन बसावे लागले नसते. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात त्यांच्याबरोबरच जातात ही राज ठाकरे यांची खासीयत आहे.

अजित पवारांना तुम्ही तुरुंगात टाकणार होता चक्की पिसिंग आता पिसिंगच्या ऐवजी किसिंग करताय तुम्ही त्यावर बोला. आपल्या बंगल्यावरती कोणाचा वावर आहे आणि कोण कोण होतं यामध्ये मला पडायचे नाही. आपण सामाजिक जीवनात वावरतो. त्यामुळे गर्दीत लोक येतात फोटो काढतात, असे संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे म्हणाले आज संध्याकाळी महविकास आघाडीची सभा आहे. शिवतीर्थावर सभा व्हावी यासाठी आम्ही प्रथम अर्ज केला. मात्र आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्री आणि सुपारीबाज बोलवण्यात आले. सत्तेच गैरवापर करत आहेत. काही हरकत नाही, आमची सभा बीकेसीमध्ये होणार आहे. या सभेला मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल , उद्धव ठाकरे, शरद पवार आहेत. उद्या सकाळी सभा पत्रकार परिषद ग्रँड हयात इथे होणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या भावेश भिंडेच्या फोटोवर संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी यांचे फोटो इक्बाल मीरची यांच्या साथीदार यांच्याबरोबर आहे ते देखील वाराणसीमधील आहे. इकबाल मिरचीचे साथीदार हे दारूचे हस्तक आहेत. हे स्वतः प्रधानमंत्री यांनी सांगितले आहे. प्रफुल पटेल त्यांच्यावर बोला. जे भ्रष्टाचारी आहेत ते त्यांच्याबरोबरच तुम्ही आहात. त्यांच्याबरोबर सर्रास उठून चहापान देखील चालू आहे. ज्या यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचाराची कुंडली तुम्ही मांडली. त्याच यामिनी जाधव यांचा प्रचार करण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी आपण येत आहात.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें