• Mon. Feb 10th, 2025

खळबळजनक ! भाजपचा धुळे शहर जिल्हाध्यक्ष, गजेंद्र अंपळकरवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

ByPolitical Views

May 19, 2024



खळबळजनक ! भाजपचा धुळे शहर जिल्हाध्यक्ष, गजेंद्र अंपळकरवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

पोलीस महानगर न्यूज नेटवर्क

धुळे – राज्यात काही ठिकाणी २० मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे लहान बहिण व भाऊ हे अंपळकर यांच्या हर हर महादेव या व्यायाम शाळेत कुस्ती शिकण्यासाठी जात असत. या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रितिका उर्फ दादू राजेंद्र राजपूत या पीडित युवतीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘तू मला आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचे’ असे सांगून आग्रह धरला. ‘माझे ऐकले नाही तर तुझ्या परिवाराला जीवे ठार मारेल’ अशी धमकी ही दिली. १० जानेवारी रोजी याच कारणावरून पीडितेसह तिची आई व कुटुंबातील सदस्यांना रस्त्यात अडवून पुन्हा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तसेच पीडित युवतीशी अंगलट येण्याचाही प्रयत्न केला. आरडाओरड करून स्वतःची सुटका करून घरी जात असताना गजेंद्र आंपळकर यांनी पोलिसात न जाण्याची धमकी दिली.

मात्र तरीही पीडित युवतीची बहीण व तिची आई दोन्ही भावांसह चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट कल्याणी अंपळकर यांनी दाखल केलेली तक्रार नोंदवून घेत फिर्यादी, तिची आई व दोन्ही भावांना अटक केली. त्यामुळे त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले. या गुन्ह्यात फिर्यादीच्या वडिलांचे ही नाव गोवण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

शेवटी न्यायालयाने घेतली दखल

अटकेनंतर बाहेर आल्यावर पुन्हा चाळीसगाव रोड पोलिसांना विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी नकार दिल्याने या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने खातर जमा करून पोक्सोसह भा. दं. वि. ३५४, ३२३, ५०४, ५०६ (२),१४३,१४७,१४८,१४९ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. संशयित आरोपीमध्ये हर हर महादेव व्यायाम शाळेचा कुस्ती प्रशिक्षक दादू राजपूत, गजेंद्र महादेव अंपळकर, कल्याणी सतीश अंपळकर, सुहास सतीश अंपळकर, जतिन उर्फ अजय आव्हाळे यांचा समावेश आहे. कोर्टामार्फत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मिळाल्याने सामाजिक व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडली आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें