उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – उद्धव ठाकरेंविरोधात भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केल्याचं तक्रारीत म्हटल आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपवर चुकीचे आरोप केले आणि निवडणूक आयोगावरही आरोप केलेत…हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्याची मागणी आशिष शेलार यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली.
मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी सेना भवनमध्ये संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केला.. तसंच कितीही उशीर झाला तरी हटू नका मतदान करा, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केले होते. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे स्वतः माहिम कोळीवाडा या ठिकाणी गेले. तिथे त्यांनी शिवसेना पदाधिका-यांशी चर्चा केली. तसंच त्यानंतर त्यांनी धारावीत जाऊनही आढावा घेतला. तर वडाळा आणि परळलाही त्यांनी भेट दिली.