• Thu. Oct 10th, 2024

मातोश्री व पुत्र मोहामुळे गजानन कीर्तिकरची शिंदे गटातून होणार हकालपट्टी?

ByPolitical Views

May 22, 2024



मातोश्री व पुत्र मोहामुळे गजानन कीर्तिकरची शिंदे गटातून होणार हकालपट्टी?

शिवसेनेत नवीन ट्विस्ट. शिवसेना उपनेते शिशिर शिंदे खासदार कीर्तिकरांविरोधात आक्रमक ; मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या पत्रातून कारवाईची मागणी

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – लोकसभा निवडणूक २०२४ साठी मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान झाले. मराठी टक्का, गुजराती आणि उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेऊन महायुती आणि महाआघाडीत जोरदार चुरस दिसली. पण आता शिंदे गटातील खदखद पण बाहेर आली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन आलेले खासदार गजानन कीर्तिकर यांची शिंदे गटातून लागलीच हकालपट्टी करण्याची मागणी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कीर्तिकरांना नारळ देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते शिशिर शिंदे खासदार कीर्तिकरांविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र धाडले आहे. गजानन किर्तीकर यांची पक्ष विरोधी वक्तव्यं केल्या प्रकरणात त्यांची शिवसेनेतून त्वरीत हकालपट्टी करण्याची आणि त्यांना निरोपाचा नारळ देण्याची मागणी केली आहे.

शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्यं केले. विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतल्याने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्याची विनंती केली. खासदार किर्तीकर मातोश्रीचे “लाचार श्री” झाले आहेत. गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. कीर्तिकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. आता गजानन कीर्तिकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. अमोल किर्तीकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी स्वत: च्या प्रचारासाठी, विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला. मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली. त्यामुळे आता त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी उपनेते शिशिर शिंदे यांनी केली.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें