• Mon. Oct 14th, 2024

विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर, २६ जूनला मतदान, तर १ जुलैला मतमोजणी

ByPolitical Views

May 24, 2024



विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर, २६ जूनला मतदान, तर १ जुलैला मतमोजणी

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधानपरिषदेच्या ४ जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी १० जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकांची तारीख बदलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील ४ जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर लगेचच चारही विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार होते. यापूर्वी मतदानाची तारीख १० जून निश्चित झाली होती. मात्र, आता नवीन कार्यक्रमानुसार ह्या निवडणुकात २६ जून रोजी होणार असून १ जुलै रोजी मतमोजणी होत आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असा प्रकारे आहे

३१ मे ७ जून पर्यंत अर्ज भरण्यात येणार त्याची १० जून रोजी छाननी करण्यात येणार आहे.१२ जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार तर २६ जून रोजी मतदान होणार आणि १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने १० जून रोजी राज्यातील बहुतांश सर्वच शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता. त्यामुळे, ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत होती. निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या, आता निवडणूक आयोगाने नव्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें