नाशिकमध्ये आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने वृद्धास लुटले; ५० हजार रुपयांची चेन घेऊन पोबारा
पोलीस महानगर न्यूज नेटवर्क
नाशिक – शहरात चोरी, लूटमार घरफोडी च्या घटना घडत असताना एक नवीनच प्रकार समोर आला आहे. आशीर्वाद देण्याचा बहाणा करून दोन अनोळखी इसमांनी एका वृद्धाच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोन्याची चेन बळजबरीने काढून घेतल्याची घटना पंचवटीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामजोखन तपेश्वर गुप्ता (वय ७७, रा. ओम्कार निवास, सागर व्हिलेज, आडगाव शिवार, नाशिक) हे दि. २२ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास धात्रक फाटा येथून पायी जात होते. त्यावेळी एका स्विफ्ट कारमधून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना जवळ बोलावले व फिर्यादी गुप्ता यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यात असलेली ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन बळजबरीने काढून घेत चोरून नेली.
या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठारे करीत आहेत.