• Mon. Oct 14th, 2024

उपचारानंतर घरी परतणाऱ्या महिलेला कारची धडक; महिलेचा जागीच मृत्यू, सायन रुग्णालयाचे डीन डॉ. राजेश ढेरे अटकेत !

ByPolitical Views

May 26, 2024



उपचारानंतर घरी परतणाऱ्या महिलेला कारची धडक; महिलेचा जागीच मृत्यू, सायन रुग्णालयाचे डीन डॉ. राजेश ढेरे अटकेत !

पोलीस महानगर न्यूज नेटवर्क

मुंबई – पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर राज्यात अनेक ठिकाणी अपघातांची मालिकाच पाहायला मिळत आहे. मुंबईत सायन हॉस्पिटलचे डीन राजेश डेरेंच्या कार धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायन  हॉस्पिटसलच्या गेट नंबर सातवर शुक्रवारी रात्री ८.३० वाजता हा अपघात घडला. मात्र अपघाताच्या १४ तासांनंतर डीनकडून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान अपघाताप्रकरणी राजेश डेरेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून सायन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

रुबेदा शेख, वय ६० वर्ष ही महिला काल सायन रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेली होती. मात्र संध्याकाळी साडेआठच्या सुमारास उपचार घेऊन हॉस्पिटलच्या गेट नंबर ७ मधून बाहेर येत असताना त्यांचा अपघात झाला. सायन हॉस्पिटलचे डीन राजेश ढेरे यांच्या कारने हॉस्पिटलच्या आतमध्ये जाताना महिलेला धडक दिल्याने अपघात होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सायन पोलिसांनी सकाळी अकरा वाजता महिलेच्या मुलाला या घटनेबद्दल माहिती दिली. मृत रुबेदा शेख यांचा मुलगा सहनावाज शेख यांनी डॉ. राजेश ढेरे यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा, असा आरोप करत मागणी केली होती. त्यानंतर सायन पोलिसांनी डॉ. राजेश ढेरे यांच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करत डॉ. राजेश ढेरे यांना अटक केली आहे. आरोपी डॉक्टर राजेश ढेरे हे दारू पिऊन गाडी चालवत होते का, या संदर्भात सायन पोलीस पुढील तपास व सर्व चाचण्या करत आहेत.

सायन हॉस्पिटलचे डीन राजेश डेरे यांच्या विरोधात सायन पोलिसांनी कलम ३०४अ, ३३८, १७७, २७९, १८४, २०३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरने पोलिसांपासून अपघाताबद्दलची माहिती लपवली, मात्र महिलेचा बॉडीवर असलेल्या जखमावरून पोलिसांनी अपघाताचा अँगलने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपास केल्यानंतर डॉक्टरच्या कारनेच अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सायन पोलिसांनी राजेश डेरे विरोधत गुन्हा दाखल करून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला असता पोलिसांना यामध्ये यश मिळालं असून आरोपी डॉक्टर राजेश डेरेला सायन पोलिसांनी अटक केली आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें