• Mon. Oct 14th, 2024

जळगावात ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद, उमेदवारांचा जीव टांगणीला

ByPolitical Views

May 26, 2024



जळगावात ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद, उमेदवारांचा जीव टांगणीला

योगेश पांडे / वार्ताहर 

जळगाव – लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे महाराष्ट्रात झाले. पाचही टप्प्याचे मतदान २० मे रोजी पूर्ण झाले. राज्यातील ४८ जागांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. तोपर्यंत मतदान झालेले ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. त्या स्ट्राँग रुमवर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे. परंतु जळगावात धक्कादायक प्रकार घडला आहे. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले. त्यानंतर उमेदवारांना धडकी भरली. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोनवरून ही माहिती कळवली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या माहितीला दुजोरा दिला. डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले असले तरी ३६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान झाले होते. या मतदानानंतर दोन्ही लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी २४ तास सुरक्षा दलाचा पहारा आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर क्षणक्षणाला आहे. परंतु रविवारी २६ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद झाला. हा डिस्प्ले सकाळी ९.०४ मिनिटांपर्यंत म्हणेज चार मिनिटे बंद होते. त्यामुळे खळबळ उडाली. ही माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी त्वरित जिल्हाधिकारींना दिली.

जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले बंद झाला होता, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फोनवरून स्पष्टीकरण दिले. डिस्प्ले बंद झाले असले तरी सर्व ३६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच त्याचे व्हिडिओ शूटिंग उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीकडून स्मिता वाघ तर महाविकास आघाडीकडून करण पवार उमेदवार आहे. या दुरंगी लढतीच्या निकालाकडे आता लक्ष लागले आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें