पुण्यात अडीच कोटींच्या फसवणूक; विकासक गणेश कोंढरेला पोलीस कोठडी
पोलीस महानगर न्यूज नेटवर्क
पुणे – शहरात बांधकाम व्यवसायिकांकडून नागरिकांच्या फसवणुकीच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. यातच आता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर गणेश कोंढरे यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष काशिनाथ सूर्यवंशी यांना विकासक गणेश कोंढरे यांच्याकडून आंबेगाव निपाणी वस्ती जांभुळवाडी रोड यांच्याकडून प्लॉटिंग संदर्भात माहिती मिळाली होती . त्यावेळी सुभाष सूर्यवंशी यांनी सदर फ्लॅाटमध्ये तीन गुंठे क्षेत्रफळ असलेला प्लॉट बुकिंग करण्याचे ठरवले त्यामध्ये एक गुंठ्याचा ९,००,०००/- प्रमाणे तीन गुंठेतील २७,००,०००/- असा व्यवहार ठरला होता.
दिनांक १७/०१/२०२१ रोजी ठरल्याप्रमाणे सुभाष सूर्यवंशी यांनी २२,०००/- रोख स्वरूपात देऊन प्लॉटची बुकिंग केली व त्यांना त्याबाबत पावती मिळाली. त्यानंतर सुभाष सूर्यवंशी यांनी गणेश कोंढरे जी के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने आजतागायत रक्कम २२,००,०००/- प्लॉटचे खरेदी करता दिली. त्यानंतर सुभाष सूर्यवंशी यांनी प्लॉट देण्यासाठी गणेश कोंढरे यांना त्याबाबत जाब विचारला असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून प्लॉट देण्यास नकार दिला व गणेश कोंढरे यांनी सुभाष सूर्यवंशी यांच्या नावे धनादेश दिला परंतु तो जमा झाला नाही तसेच सदर विकासक गणेश कोंढरे यांनी सुभाष सूर्यवंशी व इतर २२ गुंतवणूकदाराची एकूण २,७१,९८,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विकासक गणेश कोंढरे याला दि. २५ रोजी न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी आरोपीची १० दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती, परंतु विकासक गणेश कोंढरे यांचे वकिल ॲड. अभिजित सोलनकर यांचा सर्व पुरावे हे कागदोपत्री उपलब्ध असल्याचा युक्तिवाद मा. न्यायाधीश एस.जी. बर्डे यांनी मान्य करून त्यांना ३१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. याप्रकरणी ॲड. अभिजित सोलनकर व ॲड. सागर शिंदे यांनी काम पाहिले.