• Thu. Jan 16th, 2025

विधान परिषद निवडणूक; मनसेने भाजपाविरुद्ध दिला उमेदवार, अभिजित पानसे रिंगणात

ByPolitical Views

May 27, 2024



विधान परिषद निवडणूक; मनसेने भाजपाविरुद्ध दिला उमेदवार, अभिजित पानसे रिंगणात

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आता या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले असून ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. असं असतानाच आता महाराष्ट्र नव निर्माण सेनेनंही या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मनसेनेच यासंदर्भातील घोषणा केली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी प्रचार सभा घेणाऱ्या राज ठाकरेंचा उमेदवार आता भाजपाविरुद्धच उभा असेल.

देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरु आहे. या टप्प्यातील मतदान १ जून रोजी झाल्यानंतर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यात लगेच शिक्षक मतदार संघ आणि विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी मनसेनं आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेचे नेते आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. दुसरीकडे भाजपाने या मतदारसंघातून निरंजन डावखरेंना मैदानात उतरवलं असल्याने इथं मनसे विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. अभिजित पानसे हे या मतदारसंघात ओळखीचा चेहरा असल्याने पक्षाला याचा फायदा होईल असं सांगितचलं जात आहे. दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे दोनदा निवडून आले आहेत. मनसे पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर निवडणुकीच्या मैदानात दिसणार आहे. दुसरीकडे निरंजन डावखरे यांना भाजपाचाच पारंपारिक मतदारसंघ मिळाला असल्याने त्यांनाही विजयाची खात्री वाटत आहे. लवकरच या निवडणुकीचा प्रचार सुरु होणार असून आता लोकसभेच्या माध्यमातून मित्रपक्ष झालेले हे दोन्ही पक्ष या निवडणुकीत एकमेकांशी कसे लढतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें