अजित पवार चक्की पिसिंग, चक्की पिसिंग एंड पिसिंग? जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी; उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. कारण, त्यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आली आहे. लाचलुचपत विभाग या कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. पुणे लाचलुचपत विभागााकडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशी संदर्भातील पत्र समोर आलं आहे. लोकसभा निवणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी करण्यात आली आहे. जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यहार, कोरगाव येथील एक भुखंड आणि डिस्टलरी प्रकल्पासंदर्भात ही चौकशी सुरू करण्यात येत आहे. ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करुन चार्जशीट दाखल करण्यात आली होती. या कारखान्याची चौकशी सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने महायुतीत सर्व आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यानंतर अजित पवार यांनी महायुतीच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती. इडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करुन चार्जशीट दाखल करताना त्यातुन अजित पवार यांचे नाव वगळले होते. मात्र, आता पुन्हा एसीबीने चौकशी सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ईडीने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केलं होतं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी २२ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल केला. याच आधारावर ईडीने गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. जरंडेश्वर कारखाना २०१० साली विक्री करण्यात आली होती. हा कारखाना मूळ किंमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आला होता. याबाबत योग्य कार्यपद्धती पाळण्यात आली नाही, असा आरोप आहे.