• Mon. Oct 14th, 2024

संजय राऊतांना तीन दिवसांचा अलटीमेटम, माफी मागा नाहीतर खटला दाखल करू – एकनाथ शिंदे

ByPolitical Views

May 29, 2024



संजय राऊतांना तीन दिवसांचा अलटीमेटम, माफी मागा नाहीतर खटला दाखल करू – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे. संजय राऊत हे नेहमीच पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. याशिवाय सामनातून देखील त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. पण या आरोपांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तीन दिवसात माफी मांगा अन्यथा कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले असा आरोप सामनातून करण्यात आला होता. संजय राऊत यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर मानहानीचा दावा करणारा खटला दाखल केला जाईल. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान २५ ते ३० कोटी वाटले. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत या कायदेशीर नोटीसला उत्तर दिले आहे. पन्नास खोके एकदम ओके असं त्यांनी म्हटलं आहे. उलटा चोर कोतवाल को डांटे असे देखील त्यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी मोदी, शहा आणि फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरी यांचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यानंतर फडणवीस प्रचारासाठी आले. संघाचे लोकं असं नागपुरात म्हणत आहेत असा दावा त्यांनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. त्यांनी वकिलांमार्फत ही नोटीस पाठवली आहे. संजय राऊत हे सध्या परदेशात आहे. तिथून आल्यानंतर ते याबाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें