• Thu. Oct 10th, 2024

वायव्य मुंबईची निवडणूक पुन्हा होणार? अमोल किर्तीकरच्या निवडणूक निकालाला आव्हान देण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्धार

ByPolitical Views

Jun 4, 2024



वायव्य मुंबईची निवडणूक पुन्हा होणार? अमोल किर्तीकरच्या निवडणूक निकालाला आव्हान देण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्धार

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा निसटता पराभव झाला. या पराभवावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत अमोलचा पराभव झाला नसून आपण त्याला आव्हान देणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी बोलताना उद्धव यांनी अमोल किर्तीकरच्या निकालाला आव्हान देणार असल्याचे म्हटले. उद्धव यांनी म्हटले की, सर्वसामान्य माणसानं सर्वसामान्य माणसाची ताकद काय ते दाखवून दिले आहे. मस्तवालपणा दाखवणाऱ्यांचे काय होणार हे जनतेनंच दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया ठाकरे यांनी निकालावर दिली. वायव्य मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत. त्यांचा पराभव अद्याप झाला नसल्याचेही सूचक वक्तव्य ठाकरे यांनी केले.

रविंद्र वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. याआधी अमोल किर्तीकर ६८१ मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे ७५ मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा अवघ्या ६८१ मतांनी पराभव केला. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्यात पहिल्या फेरीपासून जोरदार चुरस होती. अमोल किर्तीकर यांचा २४२४ मतांनी विजय झाल्याचे जाहीर झाल्यानंतर रविंद्र वायकर यांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली. त्यानंतर किर्तीकर हे अवघ्या ६८१ मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली होती.

किर्तीकर यांना विजयी घोषित करण्यात आल्यानंतर वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर पुन्हा मतांची मोजणी करण्यात आली. ईव्हीएम मतांमध्ये अमोल किर्तीकर यांना ४ लाख ९९५ मते होती. तर रवींद्र वायकर यांना ४ लाख ९९४ मते होती. ईव्हीएममध्ये वायकरांना अवघे एकच मत अधिक होते. त्यानंतर ३०४९ पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये अमोल किर्तीकर यांना १५०० आणि रविंद्र वायकर यांना १५४९ मते मिळाली.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें