जरांगे पाटील यांची भेट घेऊन परतत असताना शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली. या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे. रात्री उशिरा बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते परतत असताना हा अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर ते रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले. जरांगे पाटील यांची भेट घेऊन परतत असताना जालना जिल्ह्यात धुळे – सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली. या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये बजरंग सोनवणे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातामधून ते सुखरूप बचावले आहेत.