अहमदनगरमध्ये जायंट किलर ठरलेल्या निलेश लंकेंच्या राइटहैंड राहुल झावरेवर प्राणघातक हल्ला
योगेश पांडे / वार्ताहर
अहमदनगर – लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात जायंट किलर ठरलेल्या निलेश लंके यांच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. खासदार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केलाय. खासदार निलेश लंके यांचा सहकारी राहुल झावरे याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. यामुळे खळबळ उडालीय. राहुल झावरे यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पारनेर तालुक्यातल्या गोरेगावमध्ये राहुल झावरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. खासदार लंके समर्थकांनी माजी खासदार सुजय विखे पाटील समर्थकांना मारहाणीची माहिती समोर आली होती. त्यानंतर पारनेर बसस्थानकावर लंके समर्थकांवर हल्ला करण्यात आला असं समजते.
अहमदनगर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे २८ हजार ९२९ मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार माजी खासदार सुजय विखे यांचा पराभव केला. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या हाय होल्टेज लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.