• Mon. Oct 14th, 2024

नाशिकमध्ये विधान परिषद शिक्षक मतदार संघांचे उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदे व ठाकरे गटामध्ये राडा

ByPolitical Views

Jun 7, 2024



नाशिकमध्ये विधान परिषद शिक्षक मतदार संघांचे उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदे व ठाकरे गटामध्ये राडा

योगेश पांडे / वार्ताहर 

नाशिक – नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. विधान परिषद शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना दोन गटात जोरदार राडा झाला. नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप गुळवे हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. याचदरम्यान शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे देखील या ठिकाणी दाखल झाले. किशोर दराडे यांच्यासोबत मंत्री दादा भूसे, माजी खासदार हेमंत गोडसे आणि विजय करंजकर हे देखील होते. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोरदार राडा झाला.

संदीप गुळवे यांनी नुकताच काँग्रेसमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे किशोर दराडे यांनी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता त्यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याचदरम्यान हा राडा झाला. यामुळे ही निवडणूक आता चांगलीच चर्चेत आली आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें