• Mon. Oct 14th, 2024

कोकण पदवीधर मतदार संघातून मनसेचा यू टर्न, अभिजित पानसे अज्ञातवासात

ByPolitical Views

Jun 7, 2024



कोकण पदवीधर मतदार संघातून मनसेचा यू टर्न, अभिजित पानसे अज्ञातवासात

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – कोकण पदवीधर मतदार संघातून मनसेने माघार घेतली आहे. मनसेने या मतदार संघातून अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. महायुतीत असूनही कोणत्याही चर्चे शिवाय मनसेने उमेदवार जाहीर केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. लोकसभेला राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानंतर लगेचच जाहीर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत मात्र त्यांनी भाजप विरोधात आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. मात्र त्यांनी तिथूनही माघार घेतली आहे. भाजपचे निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदार संघातून प्रतिनिधीत्व करतात. त्यांची मुदत आता संपत आहे. त्यामुळे या मतदार संघातून त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल. महायुतीचे तेच उमेदवार असतील अशी चर्चा होती. त्याच वेळी मनसेने अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधरसाठी मैदानात उतरवले. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली होती. मनसेने उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. आता निरंजन डावखरे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. देवेंद्र फडणवीसांनी विनंती केली म्हणून आपण उमेदवारी माघार घेत असल्याचे यावेळी नितीन सरदेसाई यांनी माध्यमांना सांगितले.

विधान परिषदेच्या ४ जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या चारही जागांची मुदत ७ जुलै २०२४ला संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ मे आहे तर, मतदानाची तारीख १० जून आहे. १३ जूनला मतमोजणी होईल. कोकण पदवीधर मतदार संघातून काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रमेश किर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीकडून निरंजन डावखरे हे मैदानात असतील.

बॉक्स कोकणात जाऊन मासे न खाताच माघारी परतले. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेच्या अभिजीत पानसेंनी माघार घेतल्याने वसंत मोरेंनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें