• Thu. Oct 10th, 2024

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता ;घर वापसीच्या वाटेवर छगन भुजबळ?

ByPolitical Views

Jun 18, 2024



महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता ;घर वापसीच्या वाटेवर छगन भुजबळ?

छगन भुजबळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात; संजय राऊत व मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याची माहिती

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छगन भुजबळ हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थ आहेत, त्यामुळे छगन भुजबळ हे पुन्हा एकदा घर वापसीच्या तयारीत आहेत. छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी पडझड झाल्यानंतर छगन भुजबळ पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या बातम्यांमुळे ही भेट महत्त्वाची ठरत आहे. भुजबळ समर्थकांकडून दबाव वाढल्यानंतर छगन भुजबळ हे विविध राजकीय पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा शिवसेना पक्षात घर वापसी करण्याबाबत आणि ज्येष्ठतेनुसार त्यांना सामावून घेण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांशी प्राथमिक बोलणी सुरू आहेत.

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात नांदगाव विधानसभा मतदारसंघावर आपले पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी दावा केला आहे. सोबतच स्वतःसाठी येवला विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाने येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्याविरोधात पक्षाचे स्थानिक नेते कुणाल दराडे हे संभाव्य उमेदवार म्हणून निश्चित केले होते. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये हा वादाचा मुद्दा बनू शकतो.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें